डॉ. अभय बंग, एम. डी.गडचिरोली सारख्या आदिवासी भागात स्वयंप्रेरणेने राहून आरोग्यसेवादेणारे डॉक्टर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक, वयाच्या चव्वेचाळिसाव्यावर्षी त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला.''... हा हृदयविकार खरंच अचानक झाला का? की वर्षानुवर्षं तो रोजहोतच होता; फक्त मला तो एक दिवशी अचानक जाणवला? मृत्यूच्याजवळून दर्शनाचा माझ्या मनावर काय परिणाम झाला? माझ्या हृदयरोगाचंकारण मला काय सापडलं? हृदयरोगातून बाहेर येण्यासाठी मी कायकेलं? मी हृदयरोगाचा उपचार करण्याऐवजी हृदयरोगानेच माझाउपचार कसा केला?''ही कहाणी 1996 साली 'साप्ताहिक सकाळ'च्या दिवाळी अंकातप्रकाशित झाली. तिने जणू पूर्ण महाराष्ट्राला हलवून सोडलं. लक्षावधीलोकांनी ती वाचली, इतरांना दिली. हृदयरोगतज्ज्ञ आपल्या रुग्णांनाऔषधासोबत तो लेख द्यायला लागले. त्या वर्षीचा उत्कृष्ट ललितकृतीचा स्व. अनंत काणेकर पुरस्कार त्या लेखाला मिळाला. पुस्तकरूपातती कहाणी आता उपलब्ध होते आहे.''... हृदयरोगामुळे माझ्या जीवनात सुरू झालेला शोध मलाहृदयरोगापलीकडे घेऊन गेला. नंतर तर तो पुढला शोधच मध्यवर्तीझाला. 'सकाळ'मधला लेख लिहिल्यावर देखील तो शोध सुरूचराहिला. तो माझा नंतरचा प्रवास देखील इथे सांगितला आहे.''शिवाय रुग्णांना, जिज्ञासूंना गरज पडते अशी माहिती शेवटी वेगळयाप्रकरणात समाविष्ट केली आहे.''... आणि या कहाणीचा अंतही झालेला नाही. अजूनही रोज काहीतरीघडतं आहे.''